मऊ मेणाहून आम्ही



मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।कठिण वज्रास भेदूं ऐसे॥१॥
 असों निजोनियां जागे।जो जो जें जें मागे तें तें देऊ॥धृ॥भले तरी देऊं गांडिची लंगोटी।नाठ्याळाचे काठी देऊं माथां॥३॥मायबापाहुनी बहु मायावंत।करुं घातपात शत्रुहूनि॥४॥अमृत तें काय गोड आम्हांपुढें।विष तें बापुडें कडू किती ॥५॥तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड।ज्याचें पुरे कोड त्याचे परी॥६॥


॥तुका आकाशा एवढा ॥


देह जाईल जाईल।यांसी काळ बा खाईल॥१॥
कां रे नुमजसी दगडा। कैचे हत्ती  घोडे वाडा॥२॥
लोडे बलिस्ते सुपती।जरा आलिया फजिती॥३॥
शरीर संबंधाचे नाते।भोरड्या बुडविती शेताते॥४॥
अझुनी तरी होई जागा।तुका म्हणे पुढे दगा॥५॥
                     

!! तुका आकाशा एवढा !!



धर्माची तु मूर्ती।पाप पुण्य तुझे हाती॥१॥
मज सोडवीं दातारा।कर्मापासूनि दुस्तरा॥धृ॥
करिसी अंगीकार।तरी काय माझा भार॥३॥
जिवींच्या जीवना। तुका म्हणे नारायणा ॥४॥

तुका आकाशा एवढा







विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम अमंगळ!!1!!
आइका जी तुम्ही भक्त भागवत!
कराल तें हित सत्य करा !!धृ!!
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर!
वर्म सर्वेश्र्वर पूजनाचें!!3!!
तुका म्हणे एका देहाचे अवयव!
सुख दुःख जीव भोग पावे!!4!!





विद्रोही संत तुकाराम

विद्रोही
संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रसारण करण्याच्या उद्देशाने हा ब्लाॅग सुरू करत आहे

मऊ मेणाहून आम्ही

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।कठिण वज्रास भेदूं ऐसे॥१॥  असों निजोनियां जागे।जो जो जें जें मागे तें तें देऊ॥धृ॥भले तरी देऊं गांडिची लं...